Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगखऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे..!, मुख्यमंत्र्यांच्या सभेचा टीझर लाँच

खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे..!, मुख्यमंत्र्यांच्या सभेचा टीझर लाँच

ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची येत्या 14 मे रोजी बीकेसी मैदानावर विराट सभा होणार आहे. बाळासाहेबांचं भाषण वापरुन या सभेचा टीझर लाँच करण्यात आला आहे. शिवसेनेने हा टीझर ट्विट केला आहे.


या टीझरच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दिसते. मी शिवसेनाप्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मी शिवसेनाप्रमुख आहे, असं शिवसेनाप्रमुख बोलताना दिसत आहेत. ढोलाच्या दणदणाटावर कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा ऐकू येतात. त्यानंतर साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाने खरऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, असं निवेदक सांगतो. शेवटी 14 मे सायंकाळी 7 वाजता, बीकेसी मैदान ही सभेची तारीख, वेळ आणि स्थळ दाखवले जाते. या व्हिडीओत तुडूंब गर्दीने भरलेली शिवसेनाप्रमुखांची सभा, त्यांचं भाषण आणि उद्धव ठाकरे यांची सभाही दाखवण्यात आली आहे.



शिवसेनेने गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाच भाग म्हणून ही सभा होत आहे. या सभेच्या माध्यमातून शिवसेना निवडणुकीचं रणशिंग फुकणार असल्याचं सांगण्यात येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -