तेलुगु अभिनेत्री सुनीथा बोया (sunitha boya) हिने हैदराबादमधील जुबीली हिल्स येथील गीता आर्ट्स ऑफिसच्या समोर अर्धनग्न आंदोलन केले आहे. गीता आर्ट्स ऑफिस हे साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्य़ा फॅमिलीच्या मालकीचे आहे. ज्यांनी नुकतेच स्पोर्ट्स फिल्म जर्सी या शाहीद कपूरच्य़ा हिंदी चित्रपटाची निर्मिती केलीय.
सुनीथाने प्रोडक्शन कंपनीने कामाचे पैसे दिले नसल्याचा आरोप केला आहे. तिला चित्रपटामध्ये काम करण्यासाठी हे पैसे मिळणार होते. संपूर्ण प्रकरणावर नाराज व्यक्त करत सुनीथाने जुबली हिल्सच्या रोड नंबर ४५ वर प्रोडक्शन कंपनीच्यासमोर आंदोलन सुरू केले.
हे पाहिल्यानंतर रस्त्यावर साफसफाई करणाऱ्या जीएचएमसी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर जुबली हिल्स पोलिस आंदोलनस्थळी पोहोचले आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.
ती केवळ गीता आर्ट्स ऑफिसच नव्हे तर तेलुगु फिल्म चेंबर कार्यालयासमोरदेखील तिने आंदोलन केले.
मीडिया रिपोर्ट्नुसार, २०१९ मध्येही तिने चित्रट निर्माता बनी वासू यांच्यावर आरोप केला होता की, भूमिका देण्याचे वचन देऊन तिला त्रास दिला होता. इंटरनेटवर व्हायरल झालेलेया एका व्हिडिओमध्ये तिने जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तिने त्यावेळी कथित प्रकरणावर स्थानिक पोलिसांना एक पत्र आणि ओपन लेटरही लिहिलं होतं.