भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. कारण, त्या त्या राज्य सरकारांकडून आकारण्यात येणाऱ्या करामुळे हा फरक दिसतो.. मात्र, सरासरी विचार केल्यास भारतात पेट्रोलचा दर 113 रुपये प्रति लिटर इतका आहे, तर जगात पेट्रोलचा सरासरी दर 102 रुपये आहे. भारतीय उपखंडात पेट्रोलचा सर्वाधिक दर भारतातच असल्याचे दिसते..
भारतात इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठलेला असतानाच, जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, जिथे पेट्रोल फक्त 1.70 रुपये प्रती लिटर दराने विकलं जातं.. वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना.. पण हे खरंय..!
जगात तेलसाठे असणारे असे काही देश आहेत, जिथं पेट्रोल-डिझेल अक्षरक्ष: कवडीमोल दरामध्ये मिळतं. जगातील 130 देशांमधील इंधनाच्या दराची यादी दर आठवड्याला अपडेट केली जाते. त्यातून ही माहिती समोर आलीय.. त्यानुसार लिबियामध्ये पेट्रोल 2.40 रुपये प्रति लिटर दराने विकलं जातं, तर इराणमध्ये हाच दर 4 रुपये प्रति लिटर आहे.
इथं मिळतं सर्वात स्वस्त पेट्रोल
जगात असाही एक देश आहे, जिथं फक्त 1 रुपया 70 पैशांत एक लिटर पेट्रोल मिळतं.. व्हेनेझुएला असं या देशाचं नाव असून, या देशात जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं. दक्षिण अमेरिका खंडात या देशाचा समावेश होतो. येथे मुबलक तेलसाठे असून, हा देश मोठ्या प्रमाणात जगभर कच्च्या तेलाची निर्यात करीत असतो.. त्यामुळेच येथे फार स्वस्तात इंधन मिळतं. शिवाय कुवैत, अल्जेरिया, अंगोला यांचाही स्वस्त इंधन मिळणाऱ्या देशांच्या यादीत समावेश होतो.
सर्वात महाग पेट्रोल भारतातच मिळतंय असं काही नाही.. जगात सर्वाधिक महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये मिळतं. येथे एक लिटर पेट्रोलसाठी तब्बल 175 रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागतात. या यादीत सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक दुसऱ्या स्थानी आहे. येथे पेट्रोलचा दर 150 रुपये प्रति लिटर आहे. नेदरलॅण्डमध्येही 150 रुपये दर आहे.. नॉर्वे व ग्रीसचाही महागड्या देशांच्या यादीत समावेश होतो.
खरं तर श्रीमंत देशांमध्ये इंधनाचे दर अधिक असल्याचे समजले जाते. मात्र, अमेरिका त्यास अपवाद आहे.. अमेरिकेची अर्थव्यवस्था सक्षम असतानाही येथील इंधनाचे दर नियंत्रणात आहेत. पेट्रोलसाठी अमेरिकन नागरिकांना साधारणपणे लिटरमागे 92.58 रुपये मोजावे लागतात.