मिरज / प्रतिनिधी
आज दि. १० मे रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व सबलिकरण मंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचे आदेशा प्रमाणे तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा मा. महापौर व विद्यमान नगरसेवक मा. विवेकरावजी कांबळे साहेब यांचे मार्गदर्शनानूसार मिरज प्रांतअधिकारी व मिरज तहसिल कार्यालय येथे युवा नेते मा. श्वेतपद्म कांबळे यांचे अध्यक्षते खाली वाढती महागाई व इतर विवीध नागरी समस्यां विरोधात तिव्र निदर्शने करून निवेदन देणेत आले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे व्ही.जे.एन.टी. आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. सतिश जाधव, सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. पोपटभाऊ कांबळे, मिरज तालुकाध्यक्ष मा. अरविंद कांबळे, मिरज शहर अध्यक्ष मा. अविनाश कांबळे, सोशल मिडीया व आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा सांगली शहर जिल्हा सचिव मा. योगेंद्र कांबळे, व्हि.जे.एन.टी. आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. सुनिल माने, मराठा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. संतोष जाधव, युवक मिरज तालुकाध्यक्ष मा. नंदकुमार कांबळे, सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा. प्रमोद वायदंडे, युवक सांगली जिल्हा-उपाध्यक्ष मा. हनमंत कांबळे, युवक मिरज शहर अध्यक्ष मा. संदिप दरबारे, मिरज शहर कार्याध्यक्ष मा. हरिष कोलप, मिरज शहर उपाध्यक्ष मा. शानूर पानवाले, कामगार आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. मारूती धोतरे, आदी उपस्थित होते.महाराष्ट्रामध्ये सद्य परिस्थितीचा आढावा घेतलेस वाढत्या महागाई मुळे सर्व सामान्य जनतेचे जगणे हालाकीचे करून ठेवले आहे. अशा परिस्थिती मध्ये महाराष्ट्र सरकार डोळे झाकूण झोपेचे सोंग घेत आहे.
लवकरात लवकर महाराष्ट्र सरकार ने वाढत्या महागाई विरोधात उपाय योजना करून जिवणउपयोगी लागणार्या वस्तूंचे दर कमी करावेत या मध्ये प्रामुख्याने पेट्रोल, डिझेल, घरगूती गॕस याचा प्रामुख्याने समावेश करावा. ह्या वस्तूंचे दर कमी केलेस इतर सर्व जिवणावश्यक वस्तूंचे दर कमी होणेस मदत होईल.तसेच भुमीहीन जनतेस त्वरीत प्रतेकी ५ एकर जमीन उपलब्ध करून देणेत यावी. ओ.बी.सी. चे राजकीय आरक्षण पूर्वरत करणे साठी महाराष्ट्र सरकार ने पाठपुरावा करून भारतीय संविधानामध्ये समाविष्ठ असलेल्या तरदूती प्रमाणे ओ.बी.सी. आरक्षण पुर्वरत करणेसाठी प्रयत्न करावा. अनूसुची जाती जमाती मधील अधिकार्यांचे आरक्षण पूर्वरत चालू करावे. गायरान जमीनीवरील भूमीहीनांचे अतिक्रमण नियमीत करणेत यावे.
महाराष्ट्र राज्य सरकार ने नोकरीमधील मागासवर्गीय अनुशेष भरावा.इतर मागण्यांचे निवेदन आज आर.पी.आय.(आ.) मिरज तालुका व शहर यांचे वतीने प्रशासकीय अधिकार्यांस देणेत आले.यावेळी निवेदन स्विकारण्यास टाळाटाळ करणारे मिरज चे तहसिलदार मा. समिर शिंगटे व रिपब्लिकन पक्ष पदाधिकारी यांचेत वादावादी झाली. यावेळी युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांनी मिरज तहसिलदार यांची लोकसेवा आयोगाकडे रितसर तक्रार करणार असून. आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही होणे बाबत पाठपुरावा करणार आहे असे सांगीतले.