आंध्र प्रदेशमध्ये ‘असनी’ चक्रीवादळासंदर्भात इशारा दिलेला आहे. आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील काही भागांमध्ये बुधवारी सकाळी पाऊस सुरू झालेला आहे.’आयएमडी’च्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये चक्रीवादळ वायव्य दिशेकडून वाढत जाणार असून, आंध्र प्रदेशजवळील बंगालच्या खाडीकडे सरकण्याची शक्यता आहे.
मंगळवारी ओडिशा आयुक्त प्रदीप कुमार जेना यांनी सांगितले होते की, “असनी चक्रीवादळ हे बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यातील किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.”
वादळाचा परिणाम किनाऱ्यावरील रस्त्यांवर झालेला आहे. म्हणून वाहतूक दुसऱ्या दिशेने वळविण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.