Sunday, August 3, 2025
Homeसांगलीसांगली :  कोयत्याने तिघांवर हल्ला!

सांगली :  कोयत्याने तिघांवर हल्ला!

सांगलीतील  वाळवा  येथे शेतात पाणी पाजण्याच्या कारणावरून कोयता, काठीने झालेल्या मारहाणीत तीनजण जखमी झाले. सम्मेद उदय नवले (वय 22), सिद्धार्थ उदय नवले (वय 20) व त्यांचे आजोबा भूपाल नवले (वय 70, सर्व रा. नेमिनाथनगर, वाळवा) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी सम्मेद नवले यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहेत.

याप्रकरणी संशयित विशाल ऊर्फ हरी शशिकांत जाधव व शशिकांत वसंत जाधव यांना अटक केली आहे. दोघांना इस्लामपूर न्यायालयाने उभे केले असता दि. 13 मेअखेर पोलिस कोठडी दिली.

सोमवारी सकाळी वाळवा-पडवळवाडी रस्त्यालगत असणार्‍या शेतामध्ये सम्मेद व सिद्धार्थ हे शेतात पाणी पाजण्यास गेले होते. त्यावेळी विशाल व शशिकांत हे पिता-पुत्र त्या ठिकाणी आले. शेतात पाणी का पाजताय, असा जाब विचारत दोघांनी कोयता व काठीने सम्मेद व सिद्धार्थ यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये सम्मेद यांच्या डोक्यात, हातावर व पायावर वार झाले. सिद्धार्थ यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली व कपाळावर कोयता मारण्यात आला. त्यांचे आजोबा भूपाल नवले यांनाही काठीने मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -