ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) महाविकास आघाडी सरकारला दणका दिलाय. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) हालचाली वाढल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी महापालिका निवडणुका (Municipal Elections) सप्टेंबर महिन्यात घ्याव्यात आणि जिल्हा परिषद निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घ्यावात अशी मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलाय. प्रभाग रचनेला वेळ लागणार असल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, 3 महिन्यांनी निवडणुका घ्याव्यात, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
>> 11 मेपर्यंत अंतिम प्रभाग रचना करण्याचे काम पूर्ण करावे असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
>> 12 मेपर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवावी.
» 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करावी असे आदेश निवडणूक आयोगाने वरील सर्व महापालिकांना दिले आहेत.