Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूर‘कोल्हापूर चप्पल जत्रा प्रदर्शन-विक्री’साठी वाहतूक मार्गात बदल

‘कोल्हापूर चप्पल जत्रा प्रदर्शन-विक्री’साठी वाहतूक मार्गात बदल

लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वाअंतर्गत 13 ते 15 मे कालावधीत ‘कोल्हापूर चप्पल जत्रा प्रदर्शन व विक्री’चे आयोजन करण्यात आले आहे. चप्पल लाईन येथे भरणार्याम यात्रेसाठी छत्रपती शिवाजी चौक ते पापाची तिकटी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. याठिकाणी केवळ प्रदर्शनाला येणार्यांपना पायी प्रवेश दिला जाणार आहे.
या काळात सीपीआर चौकातून भाऊसिंगजी रोड, माळकर सिग्नल मार्गे छत्रपती शिवाजी चौकाकडे जाणर्याण सर्व जड, अवजड मध्यम आकाराचे वाहनांना सीपीआर चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. शिवाजी चौकातून गंगावेशकडे जाणारी वाहने गुजरी, बिंदू चौक सबजेलमार्गे सोईनुसार जातील. बिंदू चौकाकडून येणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून माळकर ग्निल, भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौक मार्गे पुढे मार्गस्त व्हावे.

सीपीआर चौकातून भाऊसिंगजी रोड मार्गे येणारी जड, अवजड व मध्यम आकाराचे वाहनांनी सीपीआर ते सोन्या मारुती चौक, तोरस्कर चौक, छ. शिवाजी महाराज पुलाकडे जाणारे मार्गाने पुढे मार्गस्थ व्हावे तसेच सीपीआर चौक, दसरा चौक, स्वयंभू गणेश मंदिर चौक, बिंदू चौक मार्गे पुढे मार्गस्त व्हावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.

‘कोल्हापूर चप्पल जत्रा’ महोत्सवासाठी येणारे वाहनासाठी प्रायव्हेट हायस्कूल मैदान, गांधी मैदान, दसरा चौक, बिंदू चौक या ठिकाणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -