Monday, July 28, 2025
Homeक्रीडाIPL 2022 मधील चुरशीची लढत, मुंबई अस्तित्वासाठी तर चेन्नई प्लेऑफसाठी लढणार 

IPL 2022 मधील चुरशीची लढत, मुंबई अस्तित्वासाठी तर चेन्नई प्लेऑफसाठी लढणार 

पाच वेळाचा आयपीएल विजेता मुंबई आणि चार वेळचा विजेता चेन्नई यांच्यात आज अटीतटीची लढत होणार आहे. मुंबईचा संघ अस्तित्वासाठी मैदानात उतरणार आहे तर चेन्नईचा संघ प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ओढाताण करेल.. दोन्ही संघ विजयाच्या दृष्टीने मैदानात उतरतील.. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आज एकमेंकाविरोधात भिडणार आहेत. या दोन्ही संघाचे चाहते कट्टर आहेत.. मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यात लढाई होतेच… मैदानाबाहेर चेन्नई आणि मुंबईचे चाहते सोशल वॉर करतात.. सोशल मीडियावर हा सामना सर्वाधिक चर्चेचा असतो.

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर यंदाच्या आयपीएलचा 59 वा सामना होत आहे. चेन्नई आणि मुंबई संघ एकमेंकाविरोधात आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईच्या संघाला 11 सामन्यात 9 परभावाचा सामना करावा लागलाय. मुंबईचा संघ गुणतालिकेत दहाव्या क्रांकावर आहे. चेन्नईची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.. चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईला 11 सामन्यात सात पराभवाचा सामना करावा लागलाय.

मुंबईच्या संघाचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. त्यामुळे मुंबईकडे आता गमावण्यासारखे काहीच नाही. उर्वरित सामने जिंकून विजयी समारोप करण्याचा प्रयत्न मुंबईचा आहे. मुंबई प्रतिस्पर्धी संघाचे आव्हान संपुष्टात करु शकते.. मुंबईविरोधात आज चेन्नईचा सामना होत आहे. आजच्या सामन्यात चेन्नईला मोठा विजय आवशक आहे. आज चेन्नईचा पराभव झाल्यास, त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपेल. मुंबई स्पर्धेतून बाहेर पडलेय, पण इतर संघांना मुंबईकडून फटका बसू शकतो. कारण, मुंबई उर्वरित सामन्यात अधिक निर्भिडपणे मैदानावर उतरलेली असेल. आजच्या सामन्यात चेन्नईला कोणत्याही परिस्थिती गरजेचा आहे.. आज चेन्नईने मुंबईचा  केल्यास प्लेऑफच्या आशा जिवंत राहणार आहेत. त्याशिवाय गुणतालिकेत तीन क्रमांकाची बढत मिळेल. चेन्नईचा सघ नवव्या क्रमांकावरुन थेट सहाव्या क्रमांकावर पोहचेल.

चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामना आयपीएलचा एल क्लैसिको म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्ये आजवर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे संघ तब्बल 33 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचंच पारडं जड राहिलं आहे. मुंबईने 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने 14 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. 2022 मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा सात विकेटने पराभव केला होता. आज होणाऱ्या सामन्यात चेन्नईचा पराभव करत हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मंबई उतरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -