Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगआता निपाणीत 'भोंगा' सुरु; मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी

आता निपाणीत ‘भोंगा’ सुरु; मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

निपाणी शहर व परिसरात असलेल्या मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याची मागणी श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेनी गर्लहोसुर यांना देण्यात आले.



मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे व नियमांचे पालन करावे असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपनिरीक्षक गर्लहोसुर यांनी निवेदन स्वीकारताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार परिसरातील बेकायदेशीर भोंगे असलेल्या सर्व मशिदींना सूचना दिल्या असून याबाबतची आणखी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी संघटनेचे चिकोडी जिल्हाध्यक्ष ॲड. निलेश हत्ती, श्रीनिवास चव्हाण, संदीप मोहिते, प्रसाद औंधकर, प्रशांत केस्ती, दीपक खापे, सुरज काशीदकार, विनायक शेटके, कैवल्य देसाई, सुजल औंधकर, अर्जुन भट, वैभव पाटील आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -