Thursday, July 31, 2025
Homeब्रेकिंगराज्यसभेची निवडणूक ‘अपक्ष’ लढणार- संभाजीराजे छत्रपती

राज्यसभेची निवडणूक ‘अपक्ष’ लढणार- संभाजीराजे छत्रपती

ताजी बातमी ऑनलाईन टीम

स्वराज्य संघटनेची घोषणा

राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यासाठी मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच आपण भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजेंनी स्वराज्य या संघटनेची घोषणा केली आहे. सगळ्या मराठा समाजला एका छताखाली आणण्यासाठी ही संघटना स्थापन केली असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले आहे. ते पुणे येथे आज पत्रकार परिषदेत बोलत होते.



खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. आता पुढील राजकीय वाटचाल काय असेल यावर त्यांनी भाष्य केलं आहे. विकासकामं करण्यासाठी राजसत्ता हवी असते असं ते म्हणाले आहे. यावेळी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले. तसेच अपक्ष म्हालढणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

संभाजीराजे यांनी दुसऱ्या निर्णयामध्ये एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे. “मला वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. मला चांगलेवाईट अनुभव देखील आले. या जनतेला एका छताखाली कसं आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे. त्यामुळे मी दुसरा निर्णय असा घेतला आहे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. आजपासून ही संघटना स्थापन झाली आहे”, असं संभाजीराजे यांनी जाहीर केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -