Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरमहागाईचा झटका, बजेटला दणका!( वाचा सविस्तर )

महागाईचा झटका, बजेटला दणका!( वाचा सविस्तर )

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महागाईच्या भडकत्या वणव्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. ज्यांचे हातावरचे पोट आहे, अशा लाखो कुटुंबांना या महागाईचा जबरदस्त तडाखा बसला आहे आणि सर्वसामान्य जे कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत, त्यांचेही मासिक बजेट महागाईच्या आघाताने कोलमडले आहे. कष्टकरीवर्गाचे जगणे मुश्कील झाले आहे, तर कनिष्ठ मध्यमवर्गीयांची दरमहाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे.

वर्षभरात इंधन दरात झालेली सरासरी पन्‍नास टक्के वाढ आणि त्या अनुषंगाने सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली वाढ याची सर्वांनाच कमी-जास्त प्रमाणात झळ पोहोचली आहे. इंधनाचे दर वाढले की, मालवाहतूक भाडे वाढते. प्रवास महागतो. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ होते.

वर्षभरापूर्वी गेल्या मे महिन्यात पेट्रोलचा दर 78 रु. 31 पैसे लिटर होता. चालूवर्षी मे महिन्यात हाच दर 122 रुपयांवर गेला आहे. वर्षभरात पेट्रोल 44 रुपयांनी म्हणजे 50 टक्क्यांनी महागले आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात डिझेल दर होता लिटरला 67 रु. 25 पैसे. या वर्षीच्या मे महिन्यात हा दर 104 रुपयांवर गेला. म्हणजे डिझेल पन्‍नास टक्क्यांहून महाग होऊन डिझेल दरात 37 रु. वाढ झाली. वर्षभरात इंधनाच्या दरात एवढी वाढ होण्याची बहुधा पहिलीच वेळ असावी.

25 ते 30 हजार मासिक उत्पन्‍न असलेल्या पती, पत्नी आणि दोन मुले अशा चौकोनी कुटुंबाचे मासिक बजेट

घरभाडे 7,000
पेट्रोल (रोज 1 लिटर) 3,500
गहू 15 कि. 500
तांदूळ 15 कि. 500
तूरडाळ 2 कि. 250
इतर डाळी एक किलो 125
खाद्यतेल 3 किलो 600
किराणा 2,000
(चहा/साखर/पोहे/रवा/खोबरेल तेल/ साबण/धुण्याची पावडर/भांड्याचा साबण/मसाला पदार्थ/प्रसाधने इत्यादी)
भाजीपाला 1,500
वीज/पाणी बिल 1,500
गॅस सिलिंडर 2,000
(गॅस गिझरसह दरमहा दोन)
दूध 1,000
शालेय खर्च तरतूद 2,000
टीव्ही/मोबाईल रिचार्ज 1,000
हॉस्पिटल तरतूद 2,000
फळे 500
सणवार 500
कपडे खरेदी 2,000
नियोजनाची तरतूद
एकूण 28,475

25 हजार ते 30 हजार मासिक उत्पन्‍न असलेल्यांची खर्चाची तोंडमिळवणी करताना कशी तारांबळ उडते, हे या खर्चाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -