Wednesday, July 30, 2025
Homeसांगलीसांगली : बोगस 153 नळ कनेक्शन तोडण्यास सुरूवात

सांगली : बोगस 153 नळ कनेक्शन तोडण्यास सुरूवात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बोगस 153 नळ कनेक्शन तोडण्यास महानगरपालिकेने गुरुवारी सुरुवात केली. दोन नळ कनेक्शन तोडली. मुदत देऊनही दंड व पाणी वापराचे पैसे भरून कनेक्शन नियमित करून न घेतल्याने कारवाई करण्यात येत आहे.



महापालिकेकडील पाणीपट्टी रकमेतील अपहारप्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर बोगस नळ कनेक्शनचा फंडा समोर आला. त्यामुळे महानगरपालिकेने बोगस नळ कनेक्शन शोधमोहीम राबविली. सांगली आणि कुपवाडमध्ये 156 तर मिरजमध्ये 103 बोगस नळ कनेक्शन सापडली होती.

दरम्यान, बोगस कनेक्शनधारकांना मनपाने नोटिसा बजावून नळ कनेक्शन तत्काळ नियमित करून घेण्यासाठी कळविले होते. त्यानुसार आजअखेर बोगस 106 नळ कनेक्शन संबंधितांनी नियमित करून घेतली आहेत. अद्याप 153 बोगस कनेक्शनधारकांनी महापालिकेच्या नोटिसांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार गुरुवारपासून बोगस नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -