Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : व्यावसायिकावर चाकूहल्ला; हल्लेखोरास नागरिकांचा चोप!

कोल्हापूर : व्यावसायिकावर चाकूहल्ला; हल्लेखोरास नागरिकांचा चोप!

खर्चाला पैसे दिले नाहीत म्हणून रेकॉर्डवरील गुन्हेगाराने व्यावसायिकावर (practioner) चाकूहल्ला केला. भरवस्तीत छत्रपती शिवाजी चौकात रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. यात व्यावयासिक सागर श्रीकांत शिंदे (वय ४५) जखमी झाले. दरम्यान, हल्ला करून पळून जाणाऱ्या सुमित ऊर्फ लाल्या खोंद्रे (रा. धोत्री गल्ली) याला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जखमी शिंदे यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार झाले.

पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांचा इलेक्ट्रिकल चे सुटे भाग विक्रीचा (practioner) व्यवसाय आहे. ते शहाजी तरुण मंडळाचे पदाधिकारीही आहेत. रात्री ते शिवाजी चौकात थांबले होते. तेथे संशयित हा खोंद्रे आला आणि त्याने खर्चासाठी पैशाची मागणी केली. ‘मला हप्तास दे नाही, तर तुला सोडणार नाही’ असे धमकावले.

येथे शिंदे यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याला विरोध करून पोलिसांत तक्रार करतो, असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे चिडून खोंद्रेने चाकूने शिंदे यांच्यार खांद्यावर व पाठीवर चाकूने वार केला. यानंतर खोंद्रे पळत पापाची तिकटीकडे निघाला होता. चौकातील तरुण व नागरिकांनी धावत जाऊन खोंद्रेला पकडून चोप दिला. याची माहिती मिळताच पोलिस तेथे आले. नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्याघत दिले.

पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, जुना राजवाडा ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, लक्ष्मीपुरी ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव यांनीही सीपीआरमध्ये धाव घेऊन जखमीकडून माहिती घेतली. गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू असल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. दरम्यान, शिवाजी चौक वर्दळीचा आहे. तेथे रात्री ही घटना घडल्यामुळे तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी उशिरापर्यंत तेथे बंदोबस्त ठेवला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -