Wednesday, July 30, 2025
Homeसांगलीसांगली : बड्या औषध विक्रेत्याची पंचवीस लाखांची जीएसटी चोरी उघडकीस ; सांगलीतील...

सांगली : बड्या औषध विक्रेत्याची पंचवीस लाखांची जीएसटी चोरी उघडकीस ; सांगलीतील केंद्रिय जीएसटी कार्यालयाची कारवाई

मिरज / प्रतिनिधी
मिरजेत पंढरपुर रोडवरील एका बड्या औषध विक्रेत्याकडे केंद्रीय जीएसटी विभागाने कर चुकवेगिरी विरोधी कारवाई केली असता सदर व्यावसायिकाने २५  लाखांचा जीएसटी  बुडविला असलेचे स्पष्ट झाले आहे. सदरची कारवाई सांगली विभागीय केंद्रिय जीएसटी कार्यालयाचे पथकाने केली. 

 अधिक माहिती अशी की, सदर औषधे वितरण करणाऱ्या व्यावसायिकाने  कर भरणा न केल्याने तसेच विवरणपत्र न भरल्याने त्याची नोंदणी पूर्वीच रद्द करण्यात आली होती.  मात्र त्यानंतर त्याने कर भरला नाही व नोंदणी पुनर्स्थापित केली नाही. एवढे करुन न थांबता ग्राहकांकडून जीएसटी आकरणे त्याने चालूच ठेवले पण सदर गोळा केलेल्या कराचा शासनाकडे भरणा केला नाही.

सांगली केंद्रीय जीएसटी विभागाकडे ही माहिती प्राप्त झाल्यानंतर येथील पथकाने  सदर व्यावसायिकाच्या मेडिकलची झडती घेऊन त्यातून आक्षेपार्ह कागदपत्रे व इतर रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे. पुढील तपासणी अंती कर चुकवेगिरीची व्याप्ती अंतिम होईल व दंड केला जाईल असे जीएसटी आधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ग्राहकांनी जीएसटीची रक्कम कर दात्यांना देताना त्याची जीएसटी नोंदणी अक्टिव्ह आहे की नाही याची खात्री करून घ्यावी व मगच पुढील व्यवहार करावा अशी सूचना देत करचुकवेगिरी करणाऱ्यांची आजिबात गय केली जाणार नसल्याचा इशारा यावेळी जीएसटी पथकाने दिला आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -