भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने रावेर लोकसभा क्षेत्राच्या कार्यतत्पर, लोकप्रिय खासदार श्रीमती.रक्षाताईं खड़से यांच्या वाढदिवसा निम्मित बैनरबाजी,आतीशबाजी,अवाजवी ख़र्च न करता दि:-१३ में २०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय बोदवड़ येथे सकाळी रुग्णांना फळ वाटप करून सामाजीक उपक्रम घेऊन ताईंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रभाकरभाऊ पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्रभाऊ डापसे, मधुकर पारधी, भाजपा सोशल मिडिया तालुकाध्यक्ष रोहीत अग्रवाल, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस उमेश पाटील, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अभिषेक झाबक, युवा मोर्चा शहर सरचिटणीस सचीन जैस्वाल, सोशल मिडिया सह संयोजक सागर गंगतीरे, अमोल जंजाळ आदि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी वृंद उपस्थित होते.