Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली : घरातून चांदीचे दागिने मोबाईल व रोख रक्कम लंपास

सांगली : घरातून चांदीचे दागिने मोबाईल व रोख रक्कम लंपास

मिरज / प्रतिनिधी
रामनगर येथील घरातून चांदीचे दागिने मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद सांगली शहर पोलिसात दाखल , याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी हजरतअली गैबीसाब गलगले , वय 29 वर्षे ,व्यवसाय मजुरी राहणार रामनगर , कर्नाळ रोड, सांगली यांचे घराचे हॉलच्या दरवाज्याजवळ असलेल्या खिडकीतून हातात आत घालून आतून लावलेली कडी काढून , दरवाजा उघडून चोरट्यांनी घरातील चांदीचे दागिने ,मोबाइल , व रोख रक्कम असा एकूण 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे , याबाबत हजरत अली गलगले यानी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून , पोलिसांनी कलम 457 , 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे ,सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -