Monday, July 28, 2025
Homeमनोरंजनकोणत्या अभिनेत्रीमुळे ‘सोहेल – सीमाच्या’ संसाराला गालबोट?, घटस्फोटाची तयारी

कोणत्या अभिनेत्रीमुळे ‘सोहेल – सीमाच्या’ संसाराला गालबोट?, घटस्फोटाची तयारी

आता समोर आलेल्या माहितीनुसार सोहेल खानची पत्नी सीमा ही फॅमिली कोर्टाच्या बाहेर स्पॉट झाली असून तिनं घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही सेलिब्रेटींकडून वेगळी बातमी ऐकु येणार आहे. सोहेल आणि सीमाच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ संसार केलेल्या सोहेल खानच्या संसाराला बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीमुळे गालबोट लागल्याचे सांगण्यात येत आहे. ती अभिनेत्री कोण यावर चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले आहे.

साधारण तीन ते चार वर्षांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामध्ये सोहेल खान आणि हुमा कुरेशी यांच्यात वाढती जवळीक ही सीमापर्यत पोहचल्यानं तिनं नाराजी व्यक्त केली होती. त्याचा परिणाम त्यांच्या संसारावर झाल्याचे दिसुन आले आहे. जेव्हा ती बातमी सगळीकडे पसरली त्यानंतर हुमानं नाराजी व्यक्त केली होती. माझ्याविषयी असं काही लिहिण्याचं धाडस कोण कसं दाखवु शकतो अशा शब्दांत तिनं आपला राग व्यक्त केला होता. हुमा तेव्हा सीसीएल टीमची ब्रँड अम्बेसिडर होती. त्यादरम्यान सोहेल आणि हुमाची ओळख झाली होती.

जेव्हा हुमा आणि सोहेलविषयी बातम्या व्हायरल झाल्या तेव्हा मात्र तिच्या जागी क्रिती सेननची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर स्टुडंट ऑफ द इयरच्या दुसऱ्या पार्टचे ज्यावेळी स्क्रिनिंग होते तेव्हा सोहेल आणि सीमा खाननं हुमाला जाणीवपूर्वक ओळख देणे टाळले होते. त्याचे फोटोही तेव्हा व्हायरल झाले होते. हुमा त्यावेळी नाराज झाली होती. तिनं संबंधित व्यक्तीला त्याबाबत समजही दिली होती. तुम्ही ज्यावेळी एखादी बातमी देता तेव्हा आपल्या बातमीमुळे एखाद्या व्यक्तीची बदनामी होत असेल तर त्याबाबत संवेदनशीलपणे विचार व्हायला हवा. असेही हुमानं म्हटले होते. सध्या सोहेल खान आणि सीमाच्या घटस्फोटाच्या बातम्यांची चर्चा सुरु झाल्यानं पुन्हा एकदा हुमाचे नाव चर्चेत आले आहे.

घटस्फोटाची केस फाईल करायला गेले असल्याचे कळते आहे.त्यांनी घटस्फोटाची केस फाईल केली असली तरी ते अजूनही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे कळते आहे.सोहेल आणि सीमाच्या लग्नाला सीमाच्या कुटुंबियांची सहमती नव्हती.या जोडप्याने लपून त्यांच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केले होते.लग्नानंतर या जोडप्याला दोन मुलेही झाली.तब्बल २४ वर्षानंतर या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय का घेतला हे अजूनही उघड झालेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -