Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगMonsoon Update : पावसात भिजायला रहा तयार, 1 जूनला मान्सून महाराष्ट्रात धडकणार!

Monsoon Update : पावसात भिजायला रहा तयार, 1 जूनला मान्सून महाराष्ट्रात धडकणार!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशात उष्णतेचा पारा (Heat Wave) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उकाड्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. कधी पासून येतोय असे सर्वांना वाटत आहे. अशामध्ये पावसाची (Rainfall) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी मान्सून (Monsoon) वेळेआधीच धडकणार आहे. येत्या 27 मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी देखील आनंदवार्ता आहे. कारण पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे.



केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे 31 मे रोजी दाखल होत असतो. गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता. आता या वर्षी आलेल्या ‘असानी’ चक्रीवादळामुळे (Asani Cyclone) मान्सूनचे आगमन जरा लवकरच होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे यावर्षी चार दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी देखील ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दवर्षीपेक्षा यावर्षी चार दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 1 जून रोजी महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार आहे. राज्यातील तळकोकणात मान्सून साधारणपणे 7 किंवा 8 जून रोजी दाखल होतो. पण यावर्षी त्यापूर्वीच मान्सूनचे आगमन होणार आहे. मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्यामुळे देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -