Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगरेशनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, धान्य मोजताना फसवणूक केल्यास होणार कारवाई!

रेशनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, धान्य मोजताना फसवणूक केल्यास होणार कारवाई!

ताजी बातमी ऑनलाईन टीम
देशात रेशन कार्डच्या माध्यमातून गरजूंना स्वस्त धान्य ( Grain ) मिळते. मात्र अनेकदा शिधावाटप दुकानदार रेशनचे धान्य ( Ration Grain ) देताना कमी धान्य देत कार्डधारकांची फसवणूक करतात ही बाब निदर्शनात आली आहे. मात्र आता कमी धान्य देणार्‍या शिधावाटप दुकानदारांना चपराक बसणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ( Modi Government ) मोठा निर्णय घेतला. कार्डधारकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवा नियम केला आहे.


काय आहे नियम
रेशनचा हा गैरप्रकार रोखण्यासाठी रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल ( EPOS ) उपकरण अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कार्डधारकांना योग्य प्रमाणात धन्य मिळावे यासाठी EPOS उपकरण इलेक्ट्रॉनिक स्केलसह जोडणे बंधनकारक केले आहे. रेशन कार्डधारकांना रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि होणारी फसवणूक रोखण्यसाठी सरकारने हा नियम घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA ) देशातील 80 कोटी लोकांना अनुक्रमे 2 रुपये दराने प्रति व्यक्ती 5 किलो गहू आणि तांदूळ देत आहे.

अशी करा तक्रार
कमी धान्य मिळत असल्याची बाब तुमच्याही निदर्शनात आली तर तुम्ही याबाबत तक्रार करू शकतात. सरकारतर्फे याबाबत प्रत्येक राज्यात हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहे. यावर तुम्ही कमी धान्य देणाऱ्या शिधावाटप दुकानदारची तक्रार करू शकतात. भ्रष्टाचार कमी करत धान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. कोणत्याही रेशन कार्डधारकाला आपल्या वाट्याचे धान्य पूर्ण मिळत नसेल तर ते टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -