ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांत सीएनजी गॅस सिलिंडर दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असतानाच वायू पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. यावेळी किलोमागे दोन रुपयांची दरवाढ झाली असून रविवारपासून हे दर लागू झाले आहेत.
ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचे दर 73.61 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाजियाबाद येथे हेच दर 76.17 रुपयांवर गेले आहेत. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर, मेरठ व शामलीमध्ये प्रती किलो सीएनजीचे दर 80.84 रुपयांवर गेले असून गुरुग्राम, रेवाडी, कर्नाल, कैथल येथे हे दर क्रमशः 81.94, 84.07 व 82.27 रुपयांवर गेले आहेत. याशिवाय कानपूर, हमीरपूर व फतेहपूरमध्ये हे दर 85.40 रुपयांवर गेले आहेत. राजस्थानमधील अजमेर, पाली, राजसमंदसह इतर शहरात हे दर 83.88 रुपयांवर गेले आहेत.