ज्या व्यक्ती बद्दल महाराष्ट्राला चीड आहे, त्यांचा उल्लेख करून भावना दुखावणे योग्य नाही. बाहेरून येऊन राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. राज्यात सामाजिक सलोखा कायम राहिला पाहिजे, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एमआयएम’चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांना लगावला. एका खासगी (events) कार्यक्रमासाठी श्री. पवार कोल्हापूर विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘एमआयएम’ नेते ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्याबाबत श्री. पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘ती व्यक्ती जाऊन साडेतीनशे वर्षे झाली आहेत. त्या व्यक्तीचा इतिहास काय, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्याबद्दल इथल्या लोकांच्या मनात चीड आहे, असे असताना बाहेरून घ्यायचे आणि इथल्या लोकांच्या भावना दुखावतील, असे वागायचे. हे बरोबर नाही. पेट्रोल, डिझेल, गॅस यांची दरवाढ बेरोजगारी, महागाई या विषयांवर प्रसारमाध्यमांनी चर्चा केली पाहिजे.’’(events)
अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘मोठ्या राजकीय व्यक्तीबाबत बोलताना काळजी घ्यावी. पवार साहेबांवर अशाप्रकारे टीका करणे योग्य नाही. सत्ताधारी आणि विरोधक सर्वांनीच राजकीय संस्कृती बिघडू नये, हे पाहिले पाहिजे.’’