Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर: बिल्डींगचे कुलूप तोडून १६ लाखांची चोरी

कोल्हापूर: बिल्डींगचे कुलूप तोडून १६ लाखांची चोरी

कोव्हिड केअर सेंटर बिल्डींगचे कुलूप तोडून सुमारे १६ लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले. हॉकी स्टेडीयम परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी चौघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महादेव गंगाधर फुलारी (वय ५० रा. संभाजीनगर) कोव्हिडवरील(Corona) रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉकी स्टेडीयम परिसरातील एका इमारतीमध्ये सेंटर सुरू केले होते.

जानेवारी ते १४ मे २०२२ या कालावधीत १३. लाख ६६ हजार रुपयांची ऑक्सीजन कॉपर पाईप, फिटींग साहित्य, २ लाख रुपयांची कॉपर वायर, १५ हजार रुपये किंमतीच्या प्लास्टिक बादल्या, टेबल, स्टुल, खर्चा असा एकूण १५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल कुलूप तोडून चोरून नेला. या प्रकरणी आकाश मुळे, कासिम शेख, सागर सुर्यवंशी, रोहित कोफीतकर या संशयीतांवर गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -