जुनी धामणी तालुका मिरज येथील स्वाती संतोष गायकवाड यांच्या लग्न समारंभातून सोन्याचे दागिने आणि पंचवीस हजार रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. कर्नाळ रस्त्यावरील भोसले गार्डन मंगल कार्यालयाच्या वर पक्षाच्या खोलीत ची घटना घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.स्वाती गायकवाड यांच्या नणंदेच्या मुलांचे भोसले गार्डन मंगल कार्यालयात लग्न होते.दुपारी साडेबारा वाजता लग्न झाल्यानंतर त्यांनी दागिने व पंचवीस हजार रुपये पर्समध्ये ठेवले.दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स उघडून त्यामधील दागिने व रोख रक्कम लंपास केली.गायकवाड ह्या पावणे एक वाजता आल्यानंतर पर्स पाहिली असता त्यामध्ये दागिने व रोख रक्कम नसल्याचे समजले.त्यानंतर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले.आणि त्यांनी फिर्याद दाखल केली.
सांगली : लग्न समारंभातून दागिने आणि पंचवीस हजार रोख रक्कम लंपास
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -