ताजी बातमी ऑनलाईन टीम
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई (Hussain Dalwai) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 99 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील चर्चगेटच्या इम्प्रेस कोर्टमधील (Impress Court, Churchgate, Mumbai) आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दलवाई यांच्या निधनाने राजकीय विश्वावसर शोककळा पसरली आहे. ते राज्याचे माजी न्यायमंत्री (former state justice minister), माजी लोकसभा आणि राज्यसभा सदस्य (Lok Sabha And Rajya Sabha member) आणि खेडचे माजी आमदार राहिले होते. पेशाने वकिल असलेल्या दलवाई यांच्या पश्यात कुटूंबात मुलगा दिलावर, फिरोज, मुश्ताक आणि दोन मुली रेहाना आणि शहनाज हे आहेत.
हुसेन दलवाई यांना राजकारणातील दांडगा अनुभव होता. 16 वर्षे ते विधानसभेचे सदस्य होते. 1962 ते 78 या कालावधीत त्यांनी खेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदे मंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली. मे 1984 मध्ये त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. त्यानंतर 1984 मध्ये त्यांनी रत्नागिरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आणि ते लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले होते.
चिपळून तालुक्यातील मिरोली गावात 17 ऑगस्ट 1922 रोजी त्यांचा जन्म झाला होता. पेशाने वकिल असलेल्या दलवाई यांनी बीए एलएलबीचे शिक्षण घेतले होते. 1940 ते 1946 या काळात त्यांनी राष्ट्रीय सेवा दलासोबत काम केले. त्यांनंतर 1952 मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ कधीच सोडली नाही. ते कायद्याचे अतिशय जाणकार होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस देखील केली होती.