Monday, July 7, 2025
Homeराजकीय घडामोडीसंभाजीराजेंनी लिहिले सर्व आमदारांना पत्र

संभाजीराजेंनी लिहिले सर्व आमदारांना पत्र

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकातून जाहीर केले आहे. या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, असे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केले आहे.

पत्रकामध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता असते. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या रिक्त पदाच्या लढतीकरिता सर्व आमदारांनी मदत करावी असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -