सावर्डे (ता. हातकणंगले) येथे भरधाव वेगाने निघालेल्या मोटारसायकलने पाठीमागन जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात यशवंत रामचंद्र शेळके (वय ६७, रा. प्रतापनगर, सावर्डे) हा वृद्ध पादचारी गंभीर जखमी झाला. दरम्यान मोटारसायकलस्वार विनोद विलास जाधव (रा. कापूरवाडी) याच्यावर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी यशवंत शेळके हे श्री पेट्रोल पंपा समोरून घराकडे जात होते. सावर्डेच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मोटारसायकल (एम. एच. ०९ ए. वाय. ३१३८)ने जोराची धडक दिली. जखमीवर पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -