महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे येत्या 5 जूनला अयोध्या यात्रा करणार आहे. मात्र, त्याआधीच राजकारण चांगलेच तापले आहे. उत्तरप्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी जोरदार विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा, अशी भूमिका खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. यावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजसाहेबांचा केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेन, अशी पोस्टर्स मुंबईतील लालबाग परिसरात झळकली आहेत.
मनसेना प्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज यांनी थेट राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. अशातच राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. भगवान रामाचं ते दर्शन घेणार आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे चिरंजिव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील अयोध्या दौरा करणार आहेत. यावरून आता शिवसेना आणि मनसेमध्ये पोस्टर वार सुरू झाले आहे. त्यातच उत्तरप्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील लालबाग परिसरात राज ठाकरे यांच्या समर्थनात पोस्टर लावण्यात आले आहे.
नेमके काय लिहिले आहे पोस्टरवर…
‘राजसाहेबांचा केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेन’, असा मजकूर असलेले पोस्टर्स मुंबईतील लालबाग परिसरात लावण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून समर्थन असल्याचा दावा केला जात आहे
दरम्यान, राज ठाकरे यांच्या जीवाला धोका आहे. राज ठाकरे यांच्यासह बाळा नांदगावकर यांना जिवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.