पायापाचीवाडी (ता. मिरज) येथे झाडाच्या फांद्या तोडल्याचा जाब विचारल्याने गळा दाबून काठी, दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दिनेश रामचंद्र सूर्यवंशी यांनी गणेश पाटील, त्यांचा मुलगा व अन्य अनोळखी तीन अशा पाच जणांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. दिनेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार, पायापाचीवाडी येथे त्यांची शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये असलेल्या झाडाच्या फांद्या वरील संशयितांनी तोडून सूर्यवंशी यांच्याच शेतजमिनीच्या वाटेवर टाकल्या होत्या. सूर्यवंशी हे शेताकडे गेले असता हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी याबाबत संशयितांना जाब विचारला. त्यावेळी पाच जणांनी सूर्यवंशी यांचा गळा दाबून त्यांना काठी व दगडाने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -