पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचा खिसा मोकळा झालाय.. इंधनाच्या वाढत्या महागाई दरम्यान वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकार लवकरच पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करण्याची घोषणा करु शकते.
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी गेल्या काही वर्षापासून पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या (Ethanol) मिश्रणावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारने 2030 सालापर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनाॅल मिसळण्याचा लक्ष्य ठेवले होते. मात्र, आता 2025 या वर्षापर्यंतच हे लक्ष्य पूर्ण केले जाणार आहे..
‘या’ तारखेपासून होणार दर कमी
देशातील निवडक पेट्रोल पंपावर येत्या 1 एप्रिल 2023 पासून 20 टक्के इथेनाॅल मिश्रित पेट्रोल विक्री सुरु केली जाणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-diesel Price) मोठ्या प्रमाणात कपात होणार असल्याचे सांगितले जाते.
इथेनॉलची किंमत फक्त 62 रुपये प्रतिलिटर असेल. त्यामुळेच पेट्रोलियम मंत्री नितीन गडकरी इथेनाॅल मिश्रित पेट्रोल विक्रीसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. तेलाची आयात कमी करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पेट्रोलमध्ये 8 टक्क्यांऐवजी 20 टक्के इथेनॉल मिसळले जाणार आहे. त्यामुळे इंधन आयातीवरील मोठा खर्चही वाचेल.
पेट्रोलियम मंत्रालयाने 4 जून 2018 रोजी जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण जाहीर केले, तेव्हापासून पेट्रोलमध्ये 8 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्यास परवानगी देण्यात आली. प्रामुख्याने उसापासून इथेनाॅल तयार केले जाते. शिवाय मका, गव्हापासूनही ‘इथेनॉल’ मिळवले जाते.
शेतकऱ्यांचाही होणार फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जैव इंधनावरील राष्ट्रीय नीति-2018 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 8 टक्क्यांवरुन 20 टक्क्यांपर्यंत वाढवले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 पासून केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच पेट्रोलच्या किंमती कमी होऊ शकतात..
पेट्रोलमध्ये इथेनाॅलचा वापर सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांचाही मोठा फायदा होणार आहे.. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळू शकतो.. इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन असून, एक प्रकारचे अल्कोहोल आहे.. इथेनाॅलमुळे 35 टक्के कमी कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जन होते. सल्फर डायऑक्साइड व हायड्रोकार्बन्सचे उत्सर्जनही कमी होत असल्याचे सांगण्यात आले.