पन्हाळगडावरील रस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी मोटार (टीएस) १२ इआर २४४२) ने भारती अंकुश बडदे यांच्या मोपेड (एमएच ०९ डीटी ८८५४) ला जोरदार धडक दिली. यात भारती आणि त्यांची मुलगी स्वरा जखमी झाल्या यांची नोंद पन्हाळा पोलिसांत झाली आहे. हैदराबाद येथील जायेद खाजामोईदिन मोईन (वय २३) हे मोटार भरधाव चालवत पन्हाळगडी येत होता. त्यातच पन्हाळा विशाळगड मोहिमेसाठी आलेल्या धारकांची गर्दी होती. धारकांच्या अंगावर गाडी जाता जाता वाचली आणि बडदे यांच्या मोपेडला धडकली.
मोटारसायकलवरील महिला पडताच उपस्थित लोकांनी मोटारचालकाला मारहाण करून मोटारीचेही नुकसान केले. पोलिस निरीक्षक अरविंद काळे आणि त्यांच्या चालकाने मोटारचालकाला जमावाच्या तावडीतून सोडवून घेत पोलिस ठाण्यात आणले. याबाबतची फिर्याद हवालदार प्रकाश डमाळे यांनी पोलिसांत दिली आहे.