Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रप्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रियकराचा विधवा महिलेवर हल्ला

प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रियकराचा विधवा महिलेवर हल्ला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

उल्हासनगर ; उल्हासनगरात एका विधवा महिलेवर कारखान्यात घुसून कात्रीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. कॅम्पमधील गाऊन मार्केटमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गाऊन मार्केटमध्ये कपडे शिवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात ३६ वर्षीय विधवा महिला काम करते. या महिलेचे दयानंद फुगारे या ३६ वर्षीय इसमाशी प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणांवरून या महिलेनं दयानंद सोबत असलेले प्रेमसंबंध तोडले होते. त्यामुळे दयानंदनं पीडित महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली.


आरोपी दयानंदने पीडित महिलेवर कात्रीनं वार केल्यानंतर कारखान्यात खळबळ उडाली. या हल्ल्यात पिडीत महिलेच्या पाठीला दुखापत होऊन ती खाली पडली. पीडितेच्या जवळच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत घटनेवेळी मध्यस्थी करत महिलेला वाचवलं. त्यामुळं कारखान्यात होणारा मोठा अनर्थ टळला. यावेळी कामगारांनी दयानंद याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांच्या तावडीतून निसटून पसार झाला आहे सदर प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -