ताजी बातमी ऑनलाईन टीम
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील खुलताबाद (Khultabad) येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरवरून मोठा वाद उफळून आला आहे. एमआयएमचे खासदार अकबरुद्दीन ओवैसी (MIM MP Akbaruddin Owaisi) यांनी गेल्या आठवड्यात औरंगजेबाच्या कबरचे (Aurangzeb tomb) शाल चढवली होती. त्यानंतरच नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यात मनसेने खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व विभागाने (Archaeological Survey of India) मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे पुढील 5 दिवस औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.
खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर 18 मेपासून पुढील 5 दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. तसेच खबरदारी म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर 2 सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. तसेच पुढील परिस्थितीच आढावा घेऊन आणखी 5 दिवस बंद ठेवली जाऊ शकते, असे भारतीय पुरातत्व विभागाने काढलेल्या पत्रात म्हटले आहे. औरंगजेब कबरचे व्यवस्थापक, पोलिस निरीक्षक, जिल्हाअधिकारी, ग्रामीण पोलिस अधीक्षकांना देखील पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे.
एमआयएमचे खासदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी गेल्या औरंगजेबाच्या कबरचे (Aurangzeb tomb) दर्शन घेतल्यानंतर शिवसेनेने तिव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘तुम्हालाही त्याच मातीत गाडणार’, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार ओवैसी यांना इशारा दिला होता. त्यानंतर औरंगजेबच्या कबरवर चाल करण्याची अफवा पसरली होती. कबरचे मुख्यदार बंद करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे खुलताबादजवळ 2 दिवस तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनीही तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.