सोलापूर माढा तालुक्यातील टाकळी येथे घरात घुसून सोन्याचे दागिने व रोख रक्कम नेणाऱ्या सातजणांविरुध्द टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत बाळू भिमराव नगरे (वय ४०, रा. टाकळी, ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुधीर भारत कळसाईत, दादा बबन कळसाईत, नवनाथ बबन कळसाईत व अनोळी चार इसम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.१८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बाळू नगरे हे त्यांच्या घरात असताना सुधिर कळसाईत व त्याच्या साथीदारांनी नगरे यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ केली. मोनू सोरटे याला तू माझ्याविरुध्द पोलिस ठाण्याला मोटारसायकलवरून तक्रार देण्यासाठी का घेऊन गेला असे म्हणन नगरे यास शिवीगाळ करून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे नेकलेस, रोख १० हजार रुपये असा ६६ हजार ७५२ रुपयांचा ऐवज नेला. म्हणून टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -