कोल्हापूरचा एक तरुण सध्या चर्चेत आहे.त्या तरुणाच नाव आहे सौरभ कसबेकर या बहाद्दराने त्याच्या प्रेयसीला स्टाईलने प्रपोज केल्यामुळे सोशल मीडियावर यांची जोरदार चर्चा सुरू आहे.कोल्हापूरचा सौरभ आणि सांगलीतील मुलगी उत्कर्षा हे दोघे बुधगाव येथील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या काॅलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअर मध्ये शिकत होते.तर सौरभ आणि उत्कर्षा शेवटच्या वर्षांपर्यंत एकमेकांना ओळखत नव्हते.मात्र इंजिनिअरींगच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सौरभच्या घरातल्यांनी त्याला विचारले की मनात कोन असेल तर सांग आपण रितसर मागणी घालू.त्याने घरात उत्कर्षा आवडत असल्याचे सांगितले.घरचे उत्कर्षाच्या घरी जाऊन मागणी घातली पण हो नाही असं चाललं होतं.
उत्कर्षा ने ही अजून तीचा निर्णय सांगितला नव्हता.मग सौरभ ने एक हटके फंडा वापरला.सौरभने हायवेवर भल मोठ ५० बाय २५ च्या आकाराचे मोठे व्हिल यू मेरी मी उत्कर्षा असा डिजिटल होल्डिंग्स लावून प्रपोज केलं.यानंतर असा प्रपोज बघून उत्कर्षा ने होकार दिला.होल्डिगच्या समोर दोघांनी फोटो काढले आणि ह्या होल्डिंग्सची चर्चा कोल्हापूरात नाही तर पूर्ण सोशल मीडियावर झाली.उत्कर्षा आणि सौरभ च २७ मे रोजी लग्न होणार आहे.अनोळख्या पद्धतीने प्रपोज करुन लग्न होतं असल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.






