शिरदवाढ व अब्दुल लाट येथे कालपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना भरपूर दिलासा मिळाला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या पावसामुळे व्यापारी व दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. अब्दुललाट येथे पावसामुळे चौकामध्ये थोडावेळ ट्राफिक जाम झाले होते व पाऊस जोरात असल्यामुळे लोकांना फार त्रास सहन करावा लागत आहे.
शिरद्वाड मध्ये शेतकऱ्यांना दिलासा तर व्यापारी व दुकानदाराला फटका बसत आहे . कालपासून सुरू असलेल्या पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने लोकांचे फार नुकसान होत आहे. सुरू असलेल्या या पावसामुळे वातावरनात गारवा निर्माण झालेला आहे.






