Monday, February 23, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक: विहिरीत सापडलेल्या अर्धवट मृतदेहाचा उलगडा; तीन प्रियकरांनी केले प्रेयसीच्या पतीचे दोन...

धक्कादायक: विहिरीत सापडलेल्या अर्धवट मृतदेहाचा उलगडा; तीन प्रियकरांनी केले प्रेयसीच्या पतीचे दोन तुकडे

शेलगावथडी शिवारातील विहिरीत ११ मे, २०२२ रोजी कमरेच्या वरचा भाग नसलेला मृतदेह सापडला होता. या अज्ञात मृतदेहाचा अखेर उलगडा झाला आहे. बाभळगाव येथून बेपत्ता असलेले निराधार समितीचे माजी सदस्य दिगंबर हरिभाऊ गाडेकर यांच्या पत्नीच्या तीन प्रियकरांनीच दिगंबर याच्या शरीराचे दोन तुकडे करत, त्यांचा खून केला. या घटनेतील आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घडलेली घटना अशी की, निराधार समितीचे माजी सदस्य दिगंबर हरिभाऊ गाडेकर हे नऊ महिन्यांपासून बाभळगाव येथून बेपत्ता होते. अचानक त्याचा मृतदेह शेलगावथडी शिवारातील विहिरीत अर्धवट मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. त्यांच्या खुनास अखेर वाचा फुटली आहे. दिगंबर हरिभाऊ गाडेकर यांच्या पत्नीच्या तीन प्रियकरांनी कट रचून पळवून त्यांना पळवून नेले. जालना जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या रिधोरीच्या बंधाऱ्यावर त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (दि.२०) या तिघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सप्टेंबर २०२१ मध्ये दिंद्रुड पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी गाडेकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, बुधवारी (दि.११) शेलगावथडी शिवारात असलेल्या बापूराव डोके यांच्या शेतातल्या विहिरीत अज्ञात व्यक्तीचा कंबरेवरील भाग नसलेला मृतदेह दिसून आला. पोलिसांनी आजूबाजूच्या गावात याबाबत विचारणा केली असता, जवळपासचे कोणीही हरवल्याची घटना घडलेली नव्हती. यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडथळे निर्माण होऊ लागले. अखेर मृतदेहावर असलेल्या पॅन्टच्या खिशात काही महिलांचे फोटो आढळून आले. त्या महिलांचा शोध घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी हा मृतदेह दिगंबर गाडेकर यांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -