Homeमहाराष्ट्रआंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले, तोंडातून फेस, पर्यटकाचा...

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले, तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

आंबोली येथील धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटत असताना सापाने चावा घेतल्यामुळे हम्पी येथील पर्यटकाचा मृत्यू झाला. सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

घटना घडल्यानंतर पर्यटकाला तात्काळ प्राथमिक रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ॲम्बुलन्स ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे उपचाराअभावी त्यांचे निधन झाले. गंगाधर मरप्पा (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आंबोली धबधब्याला आले होते

हम्पी येथील काही पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोली धबधब्यावर आले होते. मुख्य धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका कठड्यावर हम्पीचा पर्यटक आंघोळ करत असताना अचानक एका सापाने चावा घेतला. काही वेळाने त्यांची शुद्ध हरपली, त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. अशा अवस्थेत त्यांना आंबोली प्राथमिक केंद्रात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी उपचार होणार नसल्यामुळे पुन्हा त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाकडे आणण्यात आले.

धबधबब्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंड परंतु मुख्य धबधबब्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्यामुळे खाली येण्यासाठी तब्बल अडीच तासाचा कालावधी लागला. तसेच उपचार न होऊ शकल्यामुळे त्या पर्यटकाचे वाटेतच निधन झाले.

सावंतवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरूहा साप मण्यार किंवा नाग जातीचा असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून शवविच्छेदनानंतर अधिक माहिती मिळू शकेल असे त्यांचे, म्हणणे आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -