Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : धाडसी घरफोडी; रोकडसह सोन्याच्या दागिण्याची चोरी

कोल्हापूर : धाडसी घरफोडी; रोकडसह सोन्याच्या दागिण्याची चोरी

कळबा येथील मिरजे गल्ली आणि शिवाजी गल्लीतील दोन बंद घराच्या दरवाज्याच्या कडी कोंडा उचकटून चोरट्यानी आत प्रवेश केला. एका घरातील तिजोरी फोडून त्यातील सुमारे साडे तीन लाखाची रोकड आणि सुमारे दीड ते दोन लाख रुपये किमतीचे सोन्या दागिने चोरट्यानी चोरून पोबारा केला आहे. यांची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ओंकार जाधव (रा. शिवाजी गल्ली, कळंबा, ता करवीर ) यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोल्हापूरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ते 20 मे रोजी आईच्या सेवेसाठी घराला कुलूप लावून हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडून त्यातील तीन लाख पन्नास हजार रुपयांची रोकड आणि सोन्या दागिने लंपास केले. चोरी ही घटना शनिवार 21 मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानी यांची माहिती ओंकार याला फोनवरून दिली. ते त्वरीत घरी आला असता त्यांना चोरट्यांनी तिजोरीतील तीन लाख पन्नास हजार रुपये व सोन्या दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले.

तसेच मिरजे गल्लीतील भाड्याच्या घरात राहणारे पांडुरंग जगताप हे सहकुटुंब परगावी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी कोणीही राहण्यास नव्हते. त्यांच्या बंद घरचा कडी कोयडा उचकटून चोरट्यानी आत प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडली. पण परगावी जाताना जगताप यांनी मौलवान दागिण्यासह अन्य किमती वस्तु सोबत घेवून गेले होते. त्यामुळे त्याच्या घरात चोरट्याच्या हाती काही लागले नाही. या चोरीची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -