Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगत्यांचं हिंदुत्व पोकळ, आमचं हिंदुत्व रिझल्ट देणारं, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही?;...

त्यांचं हिंदुत्व पोकळ, आमचं हिंदुत्व रिझल्ट देणारं, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही?; राज ठाकरेंचा सवाल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांची ठाणे, मुंबईमध्ये सभा झाल्यानंतरा आज त्यांची आज पुण्यामध्ये सभा झाली. अनेक आक्रमक मुद्द्यांवर भाषण करत राज ठाकरे यांनी सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली. आगामी अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यांचा देखील त्यांनी चांगला समाचार घेतला. या भाषणावेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या (Hinduttva) मुद्द्यावरुन टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. ‘त्यांचं हिंदुत्व पोकळ, आमचं हिंदुत्व रिझल्ट देणारं’, असे म्हणत राज ठाकरे यांनी निशाणा साधला.



राज ठाकरे यांनी भाषणावेळी थेट मुख्यमंत्र्यांवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो.’ तसंच, ‘ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं, त्यांच्यासोबत तुम्ही लडाखमध्ये जेवताय? हे सगळे ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व पकपकपक बोलण्यासाठीच आहे. यांना दुसऱ्या गोष्टी नको आहेत.’, असे ते म्हणाले.


अयोध्या दौऱ्यावरुन राज ठाकरेंवर टीका करण्यांचा देखील त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली, असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून आराखडा आखला गेला. मी एकाच गोष्टीचा विचार केला. मी अयोध्येला जाणार, याचा जो विचार मनात होता. मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतं, पण जिथे माझे कारसेवक मारले गेले, त्या जागेचंही दर्शन मला घ्यायचं होतं. राजकारणात भावना अनेकांना समजत नसतात.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -