Thursday, July 24, 2025
Homeमहाराष्ट्रदारु पाजून केले अश्लिल कृत्य; पुण्यातील धक्कादायक प्रकार

दारु पाजून केले अश्लिल कृत्य; पुण्यातील धक्कादायक प्रकार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

घराजवळ खेळत असलेल्या एका दहा वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचे दोघांनी अपहरण केले. त्यानंतर तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यासोबत अश्लिल कृत्य केले. ही धक्कादायक घटना काळेपडळ परिसरात शुक्रवारी (दि.20) रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी एका 32 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राठोड नावाचा व्यक्ती आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 10 वर्षाची मुलगी दिव्यांग असल्यामुळे तिला बोलता येत नाही. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ती घराजवळ असलेल्या कॉलनीत खेळत होती. यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी तिला कशाचे तरी आमिष दाखवून मोटारसायकलवरुन जबरदस्तीने एका ठिकाणी पळवून नेले. तेथे मुलीच्या अज्ञान व दिव्यांगपनाचा फायदा घेऊन राठोड व त्याच्या साथीदाराने दारू पाजून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करून विनयभंग केला. तसेच तिचे केस ओढून लैंगिक छळवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याचे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लक्षात आल्यावर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. तेव्हा रात्री साडेअकरा वाजता ती मिळून आली. राठोड यानेच मुलीला ती राहत असलेल्या परिसरात आणून सोडले होते. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिला. मुलीचे नातेवाईक तिचा शोध घेत असताना नागरिकांनी मुलीला सोडणाऱ्या व्यक्तीची माहिती दिली. त्यानुसार तिच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत राठोड आणि त्याच्या साथीदाराच्या विरुद्ध फिर्याद दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -