Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगशिवसेना संध्याकाळपर्यंत दुसरा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता, संभाजीराजे नाही तर कुणाला मिळणार...

शिवसेना संध्याकाळपर्यंत दुसरा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता, संभाजीराजे नाही तर कुणाला मिळणार संधी?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शिवसेना प्रवेशाची ऑफर नाकारल्यात जमा आहे. कारण, उद्धव ठाकरे यांनी ‘शिवबंधन’ बांधण्यासाठी संभाजीराजे यांना आज ‘वर्षा’वर येण्यासाठी निरोप दिला होता. मात्र, दुपार उलटून गेल्यानंतरही संभाजीराजे वर्षाकडे फिरकले नाहीत. अशावेळी आज संध्याकाळी शिवसेना (Shivsena) आपल्या दुसऱ्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे शिवसेना उमेदवाराची घोषणा करतील. महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील (Rural Area) शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाला राज्यसभेची उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मात्र, शिवसेनेकडून दुसर उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली. तसंच संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफरही देण्यात आली. याबाबत उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात दोन बैठका पार पडल्या. तर शिवसेना नेते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उदय सामंत यांनीही रविवारी संभाजीराजे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांचा निरोप देण्यात आला. मात्र, आज संभाजीराजे वर्षा बंगल्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी शिवसेना आज संध्याकाळी दुसरा उमेदवार घोषित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -