Saturday, July 26, 2025
Homeसांगलीसांगलीत रागाने बघण्याच्या कारणावरुन एकाचा खून तर एकजण गंभीर जखमी

सांगलीत रागाने बघण्याच्या कारणावरुन एकाचा खून तर एकजण गंभीर जखमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शहरातील वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याजवळ एकमेकाकडे रागाने पाहण्याच्या कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे.मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.चार संशयितानी हे कृत्य केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले‌.तुकाराम मोटे वय वर्षे २७ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.



मंगळवारी तुकाराम त्यांच्या मित्रांसोबत वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याजवळ बोलत थांबला होता.काही अंतरावर संशयित ही बोलत थांबले होते.त्यावेळी एकमेकांच्याकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन वाद झाला.वाद वाढत गेल्याने संशयितांनी तुकाराम आणि त्याच्या मित्रावर चाकूने वार केला.चाकूचा वार बसल्याने तुकाराम जागीच कोसळला.



त्यानंतर संशयित पळून गेले.गंभीर जखमी अवस्थेत तुकारामला सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले.मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.तर त्यांच्या मित्रावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -