Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगदुचाकीस्वारांसाठी महत्त्वाची बातमी! मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक!

दुचाकीस्वारांसाठी महत्त्वाची बातमी! मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांसंदर्भात (Traffic Rule ) मुंबईकरांना नवा फर्मान काढला आहे. मुंबईत यापुढं दुचाकी चालवताना विशेष काळजी घेत नियम पाळावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांनी काढलेल्या आदेशानुसार, आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत मुंबई वाहतूक शाखेने तसे आदेश काढत मुंबईकरांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.



वाहतूक शाखेने आदेशात म्हटले आहे की, अनेक दुचाकीधारक हे मुंबईत दुचाकी चालवताना नियम न पाळत विना हेल्मेट दुचाकी चालवतात. दुचाकी चालवणाराच नाही तर त्याच्या मागे बसलेली व्यक्ती देखील हेल्मेटचा वापर करत नाही. विना हेल्मेट दुचाकी चालवणे कायद्याने गुन्हा असून कायद्यानुसार 500 रुपये दंड तसेच वाहतूक परवाना तीन महिन्यासाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार आता दुचाकी धारकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. नियमानुसार दुचाकी चालविणारा तसेच त्याचा मागे बसणाऱ्या पिलियन रायडरला देखील हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.

दिवसाचा अल्टिमेटम
15 मुंबई वाहतूक शाखेने आदेश जारी करत नागरिकंना वाहतूक नियमांसंदर्भात ताकीद दिली आहे. यासह मुंबईकरांना 15 दिवसांचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे. 15 दिवसात हा नियम लागू होत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपये दंड तसेच 3 महिने लायसन्स रद्द केले जाणार आहे. त्यामुळे आता मोटारसायकलवर जाताना चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट बंधनकारक असणार आहे. अन्यथा करावी होईल हे नक्की.

मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. वाहतूक समस्या याठिकाणी गंभीर झाली आहे. त्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. वाहतूक नियम न पाळणाऱ्यांमुळे लहान मोठे अपघात होत असतात. दुचाकीचा अपघात होण्याचे प्रमाण यात जास्त असून हेल्मट नसल्यामुळे डोक्याला मार लागल्याने काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -