Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरइचलकरंजीसह कोल्हापूर सांगली : पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचे...

इचलकरंजीसह कोल्हापूर सांगली : पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचे…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यात ( Maharashtra ) सध्या उष्णतेची लाट तीव्र (Heat Wave ) आहे. अशातच गेल्या काही दिवसात राज्यातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने येत्या तीन-चार दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला असून मुंबईसह 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ( IMD ), कोकण, विदर्भ आणि खान्देशच्या काही भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.



हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी 3/4 दिवसात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -