ताजी बातमी ऑनलाईन टीम
रजत पाटीदारच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर ( Lucknow Super Giants) 14 धावांनी दमदार विजय मिळवला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळवला गेलेल्या आयपीएल 2022 च्या या सामन्यात रोमांचक विजयासह आरसीबी संघ थेट क्वालिफायर-2 मध्ये (Qualifier-2) दाखल झाला आहे. आता क्वालिफायर-2 मध्ये आरसीबीचा मुकालबा राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.
तत्पूर्वी पावसामुळे टॉसला उशीर झालेला टॉस हारल्यानंतर या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना लखनऊसमोर विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेवटच्या षटकापर्यंत सामना रोमांचक बनला होता. मात्र 19 व्या षटकात हेजलवूडने जबरदस्त गोलंदाजी करत दोन विकेट घेतल्या आणि आरसीबीचा विजय पक्का केला. आजचा सामना जिंकल्यानंतर आरसीबी 27 मे रोजी राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. तर पराभूत लखनऊ संघाच्या ट्रॉफीच्या आशा आज संपुष्टात आल्या आहेत.