Saturday, March 15, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; दोघांना मारहाण शहापूर पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा

इचलकरंजी ; दोघांना मारहाण शहापूर पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम


किरकोळ कारणावरून झालेल्या वादात धक्काबुक्कीसह लाथाबुक्क्यांनी व दगडाने केलेल्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले. या प्रकरणी शहापूर पोलिसात सागर बोराडे, सागर सुरेश गंदे. संदीप शिवाजी परीट व अनिल बाबुराव कांबळे (सर्व रा. गणेशनगर शहापूर) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महेश वामन कांबळे (वय २९ रा. आंबेडकरनगर) व कृष्णा महादेव खिलारे अशी जखमींची नावे आहेत.


याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी व आरोपी हे मित्र असून २४ मे रोजी सर्वजण अमर हवालदार या मित्राच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्याठिकाणी मद्यप्राशन करत असताना सागर बोराडे याने कृष्णा खिलारे याच्याशी वाद घालत शिवीगाळ करत घराजवळ चल तुला दाखवतो असा दम भरला.


जेवणानंतर महेश व कृष्णा घरी परतत असताना त्यांचा सागर याच्याशी पुन्हा वाद झाला. त्यावेळी हवालदार याने बाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण बोराडे व गंदे यांनी महेश व कृष्णा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच दगड उचलून महेश याच्या कपाळावर मारले. या प्रकरणी महेश कांबळे याने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -