Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमहत्वाची बातमी! म्हाडाच्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत मोठा बदल, घरांच्या क्षेत्रफळातही बदल

महत्वाची बातमी! म्हाडाच्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत मोठा बदल, घरांच्या क्षेत्रफळातही बदल

ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबईत (Mumbai) घर विकत घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. म्हाडामध्ये स्वस्त घरं (MHADA Home) मिळतात त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या सोडतीची आतुरतेने वाट पाहत असतात. पण आता म्हाडाची घरं घेणं सोपं राहिले नाही. कारण म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत बदल करण्यात आले आहेत. ऐवढंच नाही तर म्हाडाच्या घरांच्या क्षेत्रफळातही (Area of MHADA houses) बदल करण्यात आला आहे.



अत्यल्प गटासाठी आता वार्षिक 6 लाख तर अल्प गटासाठी 6 लाख ते 9 लाख रुपये, मध्यम गटासाठी 9 ते 12 आणि उच्च गटासाठी 12 ते 18 रुपये अशी मर्यादा करण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाकडून या संबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तसंच 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ही उत्पन्न मर्यादा लागू असणार आहे.

म्हाडा सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे वेगवेगळे उत्पन्न गट आहेत. या प्रत्येक उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. या उत्पन्न मर्यादेनुसारच ज्यांना घर घ्याचे आहे त्या इच्छुकांना अर्ज भरणे अत्यंत गरजेचे असते. पण आता म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्याचसोबत घराच्या क्षेत्रफळामध्ये देखील बदल करण्यात आला आहे. यापुढे म्हाडाच्या विभागीय मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी ही उत्पन्न मर्यादा लागू असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -