ताजी बातमी ऑनलाईन टीम
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या नियुक्तीवरून रस्सीखेच सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. याप्रकरणी राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी ममता सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.
पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी बैठकीनंतर सांगितले की, बंगालच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना राज्यातील विद्यापीठांचे कुलपती बनवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आतापर्यंत राज्यपाल हे राज्य विद्यापीठाचे कुलपती होते. पण यापुढे मुख्यमंत्री कुलपती असतील असे त्यांनी सांगितले.