Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे गणित-विज्ञान कच्चे : नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वे

महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे गणित-विज्ञान कच्चे : नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांतील सरासरी तीन पैकी एक विद्यार्थी विज्ञान आणि गणित विषयातील बेसिक प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. तसेच विज्ञान आणि गणित विषयातील त्यांची कामगिरी खराब असल्याचे नॅशनल ॲचिव्हमेंट सर्व्हे २०२१ मधून समोर आले आहे. हा सर्वे बुधवारी (दि.२५) सायंकाळी जाहीर करण्यात आला.



हा सर्व्हे नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. नॅशनल ॲचिव्हमेंट सर्व्हेमध्ये भारतातील १.८ लाख शाळांमधून ३४ लाख विद्यार्थांचे परीक्षण करण्यात आले होते. विद्यार्थी आपल्या वयोमानानुसार अपेक्षित असलेले ज्ञान मिळवतात का? विद्यार्थ्यांमध्ये किती सुधारणा होतात? हे पाहण्यासाठी हा सर्वे घेण्यात आला होता.


नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वे हा नोव्हेंबर २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या काळात करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांचीही चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सर्व्हे धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सर्व्हेमध्ये वयोमानानुसार गणित-विज्ञान विषयातील ज्ञान वाढले नाही, असे या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -